E-Pik Phani 2024: शेतकरी मित्रांनो नमस्कार, राज्यातील रब्बी पेरण्या ह्या अंतिम टप्यात असून अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा हा भरलेला आहे. पण ई पीक विम्याची भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे खरीप हंगामा मध्ये शेतकऱ्यांना डिजिटल पिकांची पाहणी करावी लागणार आहे. गेल्या वर्षी बहुतांश भागांमध्ये ऑनलाईन म्हणजे डिजिटल ई पीक पाहणी ही केली आहे तर राज्यात यंदा ई पीक पाहणी ही केव्हा सुरू होणार आहे या संदर्भारत सविस्तर माहिती.
E-Pik Phani 2024
रब्बी हंगाम 2024 मध्ये ज्वारी, हरभरा, गहु, मका, या पिकांचा समावेश आहे. राज्य सरकारने या पिकांचा पीक विमा भरण्याकरता 30 नो. ही तारीख दिली होती.
राज्यांमध्ये शेतकरी स्तरावर पाहणी करण्याकरता 15 डिसेंबर ते 15 जानेवारी ही मुदत देण्यात आलेली आहे. व सहायक स्तरावर पाहणी करण्यासाठी 16 जानेवारी ते 28 फे देण्यात आलेली आहे.
ई पीक पाहणी ही app च्या साह्याने करायची आहे. यासाठी प्लेस्टोअर वर जाऊन ई पीक पाहणी असे सर्च करून सर्वात आधी जे app येईल ते डाउनलोड करावे.
नंतर रजिस्टर करून शेता मध्ये जावे त्या नंतर ई पीक पाहणी ही करावी.
मित्रांनो ही माहीती तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा.